ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभुर्णा येथे कृषी निविष्ठाधारकांची खरीप हंगामपूर्व आढावा सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पोंभुर्णा येथे दिनांक २० मे २०२६ रोजी खरीप हंगामपूर्व नियोजन सभा तसेच साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्रीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी श्रीमती एस. एम. ढोबळे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) गणेश गवळी, उपकृषी अधिकारी एस. जी. कोसरे तसेच उपकृषी अधिकारी श्रीमती व्ही. डी. भाले उपस्थित होते.

यावेळी कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) गणेश गवळी यांनी उपस्थित कृषी निविष्ठाधारकांना परवाना, ई-पॉस मशीन, दरफलक व साठा फलक अद्ययावत ठेवण्याबाबत सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके पुरविण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.

शासनाच्या प्राप्त सूचनेनुसार सन २०२५-२६ पासून साथी पोर्टलवरून बियाण्यांची विक्री करणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच युरिया टॉप-२० विक्रीविषयीही निविष्ठाधारकांना मार्गदर्शन करण्यात आले. खरीप हंगामात उद्भवणाऱ्या विविध शंकांचे निराकरण देखील करण्यात आले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी श्रीमती एस. एम. ढोबळे यांनी केले. सूत्रसंचालन उपकृषी अधिकारी एस. जी. कोसरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपकृषी अधिकारी श्रीमती व्ही. डी. मानकर यांनी मानले.

कार्यक्रमाला कृषी केंद्र चालक संघटनेचे अध्यक्ष पुंडलिक वासनवार, सचिव प्रसाद शादरपवार तसेच पोंभुर्णा तालुक्यातील कृषी केंद्र चालक व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये