इंधन विक्री करताना नियमांचे उल्लंघन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वडनेर येथे दि 23/05/2026 रोजी रात्री डायल 112 वर 00/51 या माहिती प्राप्त झाली की, दारोडा गावाजवळील ARS Energy HP Fuel Station पेट्रोल पंपावर कॉलर घटनास्थळी हजर असुन कॉलर ला पेट्रोल पंप चालक डीझेल देत नसुन वेगळे टैंकर भरून डिझेल नेत आहे. त्यावर डायल 112 पथक तथा पोलीस स्टेशन वडनेर येथे नाईट डयुटी ऑफीसर दारोडा गावाजवळील ARS Energy HP Fuel Station पेटोल पंपावर गेले असता तेथे डिझेल टाकण्याचे युनीटजवळ एक टैंकर उभा होता. सदरवेळी त्या ठिकाणी पेट्रोल पंपचालक यांनी इंधन विक्री करताना नियमांचे काही उल्लंघन केले आहे काय याबाबत तपासणी करून कारवाई करणे आवश्यक वाटल्याने तालुका पुरवठा विभागाचे अधिकारी श्री भांडेकर यांना भ्रमणध्वनी व्दारे वरीलप्रमाणे माहीती दिली असता ते पंपावर आले. त्यांनी सदर प्रकरणी तपासणी करून दारोडा गावाजवळील ARS Energy HP Fuel Station चे व्यवस्थापक नयन विनोद खोब्रागडे रा. पालोरा त. मोहाडी जि. भंडारा यांनी यातील टैंकर के एम एच 34 बी झेड 9030 चे चालक निहालचंद पुझारत यादव रा. आजमगड राज्य उत्तरप्रदेश याचे ताब्यातील टँकरवर स्थापीत केलेल्या इंधन टाकीमध्ये नोझलव्दारे 169.89 गैरप्रकारे डिझेल विक्री केल्याचे दिसुन आले. यावरून दारोडा गावाजवळील ARS Energy HP Fuel Station यांनी मोटार स्पिरीट अॅन्ड हाय स्पीड डिझल रेग्युलेशन ऑफ सप्लाय डिस्ट्रीब्युशन अॅन्ड प्रिव्हेंशन ऑफ मालप्रक्टीस ऑर्डर 2005 व जीवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 कलम 03 चे उल्लंघन केल्याने पुरवठा विभागाचे विभागाचे अधिकारी श्री भांडेकर यांचे अहवालावरुन श्री. योगेश शिंदे, तहसिलदार, हिंगणघाट यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन वडनेर येथे अप कं 199/2026 कलम 3,7 जिवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनात वडनेर पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई दरम्यान टैंकर के एम एच 34 बी झेड 9030 की अं 50,00,000/- रु तसेच त्यातील कर्पाटमेंट मधील 169.89 डिझेल की 16,153/-रू. असा एकुण 50,16,153/-रू माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक जि. वर्धा, श्री सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधीक्षक, जि. वर्धा, श्री मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा, व श्री सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात पुरवठा विभाग हिंगणघाट व तहसिलदार, हिंगणघाट यांचेसह संयुक्तपणे पोलीस स्टेशन वडनेर येथील पोलीसांकडुन करण्यात आली आहे.



