वर्धा नदीत बुडून 10 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : अधिक मासानिमित्त कुटुंबासह नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या 10 वर्षीय मुलीचा पाय घसरून नदीत बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोटेश्वर येथील वर्धा नदीवर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज प्रकाश तवाडे (वय 45, रा. वर्धा) हे आपल्या कुटुंबासह अधिक मासानिमित्त कोटेश्वर नदीवर आंघोळ व दर्शनासाठी गेले होते. सकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास नदीकाठी बसून कुटुंबीय आंघोळ करत असताना त्यांची मोठी मुलगी भक्ती मनोज तवाडे (वय 10) हिचा अचानक पाय घसरला व ती पाण्यात पडून बुडाली. मुलीचा शोध घेतला. काही वेळाने भक्तीचा मृतदेह पाण्याच्या तळाशी आढळून आला. तिला त्वरित बाहेर काढून इतरांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, भिडी येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहिती वरुण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सपोनि संदीप कापडे ठाणेदार देवळी यानचे मार्गदर्शन बिट अंमलदार विनोद कांबळे करीत आहे.



