“गांजा अंमली पदार्थाची विक्री करणा-या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 22 मे 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन अल्लीपुर हद्दीतील मौजा कानगाव येथे राहणा-या पुंडलिक पळसराम निमसडकर याचे राहते घरी एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपी पुंडलिक निमसडकर हा मोक्कावर रंगेहाथ गांजा अंमली पदार्थांची विक्री करतांना मिळुन आला असुन, सदर गांजाचा पुरवठा त्यास आरोपी सैदु शहा रा. इतवारा वर्धा याने केल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीचे ताब्यातुन निव्वळ 01 किलो 177 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ, गांजाविक्रीचे नगदी 40,900 रू, मोबाईलसह जु.कि. 74,440 रू चा मुद्देमाल जप्त करून, दोन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. अल्लीपुर येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, स.पो.नि. आशिषसिंग ठाकुर, पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.



