फिर्यादीचा तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन देवळी येथे फिर्यादी यांनी दि.20.01.2025 तक्रार दिली की अबक यांना अक्षय झोरे यांनी त्याचे मालवाहू गाडीमध्ये बसून पुलगाव येथे फळ विक्री करिता घेऊन गेला व अ ब क कडून फळ/भाजीपाला विक्री करून घेतले आरोपी यास सदर अ ब क हा अल्पवयीन असल्याची माहिती असताना सुद्धा अबक याचे आई-वडिलांना कोणतेही प्रकारची माहिती न देता किडनॅपिंग करून घेऊन जाऊन त्याच्याकडून फळ व भाजीपाला विक्री करून घेतल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन देवळी येथे आरोपी अक्षय झोरे रा. देवळी याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
अपराध क्रमांक 367/2026 कलम 137(2)BNS सहकलम 79 बाल अधिनियम सहकलम 3, 14 बालकामगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे असून सदर गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीला 22 मे 2026 PCR देण्यात आला आहे या सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन देवळी करीत आहे.



