ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अपघात कमी करण्याचे वाहतूक शाखेचे सर्व वाहन चालक यांना आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यात अपघातात मृत्यू ची संख्येत वाढ झालेली आहे वर्धा जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग 1, राष्ट्रीय महामार्ग एकूण 6. एकूण राज्य महामार्ग 7, असे एकूण 560 किलोमिटर चे महामार्ग हायवे आपल्या जिल्ह्यातून जात असतात.या वर्षात जिल्ह्यात 136 एकूण अपघात गुन्हे दाखल झालेले असून 70 व्यक्ती आतापर्यंत यावर्षी मरण पावलेले आहेत, व 40 इसम मोटार सायकल चालक हे जखमी हि झालेले आहेत, हे सर्व अपघात अति वेगlणे वाहन चालवीने, हेल्मेट चा वापर न करणे, दारू पिवून वाहन चालविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविल्यामुळे सदर अपघात झालेले आहेत. त्यामुळे वाहन चालक यांनी आपले वाहन वेग मर्यादेत चालवावे, हेलमेट चा वापर करावे दारू च्या नशेत वाहन चालवू नयेत,

जिल्ह्यात सावनगी मेघे. हिंघणघाट. सेलू. पुलगाव, देवळी, अल्लीपूर या भागात अपघात संख्येत वाढ झालेली आहे.

रोडवर अपघात झालेला असल्यास त्वरित डायल 108.112, 1033 यावर अपघाताची माहिती द्यावे जखमी इसम यांना रोडचे बाजूला करून दवाखाण्यात उपचार करिता दाखल करावे, अपघातात मदत मिळणे करिता **Good Samaritan** मोबाईल ऐप चा वापर निशुल्क करावे.

वाहतूक पोलिसांनी मोटार वाहन कायदयाचे उल्लंघणं करणारे 36000 चालक यांच्यावर कार्यवाही करून 26 लाख रुपयांचा दंड हि शासन जमा केलेला आहे तरी वाहन चालक यांच्या वर्तुणुकीमध्ये सुधारणा हि झालेली नाही आहे त्याकरिता सर्व वाहन चालक यांनी मोटार वाहन कायद्याचे पालन करावे व जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करणेस पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा यांनी केलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये