ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

सुदैवाने जीवितहानी टळली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा वर्धा-नागपूर रस्त्यावर भीषण अपघात झाला. रस्त्यावर अचानक रोड रोलर आडवा आल्याने बस थेट शेतात जाऊन धडकली. या अपघातात बसमधील काही प्रवासी तसेच एका दुचाकी वाहनचालकालाही दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेनंतर तत्काळ ॲम्बुलन्सच्या मदतीने जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच मदतीसाठी टायगर ग्रुप वर्धा जिल्हाचे सुनील मंगरूळकर, निलेश गोत्रे, सदस्य तसेच पवनार ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले.

सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये