सेलू ग्रामीण रुग्णालयाचा बेजबाबदार कारभार उघड!
सरकारी कर्मचारी सुखनिद्रेत, रुग्ण मात्र व्हरांड्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सरकारी आरोग्य यंत्रणेचा निर्लज्जपणा चव्हाट्यावर.
सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील संतापजनक आणि लाजिरवाणा कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असलेला आहे हा उघडेपणा खेळ प्रशासनाच्या निष्काळजी पणामुळे घगळ आहे. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना बेड, स्वच्छता गृह आणि मूलभूत अधिकार सुविधा सुध्दा मिळत नसल्याने रुग्णालयातील काही कर्मचारी मात्र निवांतपणे गाढ झोपेत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
सरकारी रुग्णालय म्हणजे गोर गरीब जनतेला आणि सर्वसामान्य जनतेला शेवटचा न्याय अधिकार मिळवून देण्यासाठी आधार पण आहे सेलू ग्रामीण रुग्णालयात मात्र हा आधारच कोलमडल्याचे दिसून येत आहे. भरती रुग्णांना रुग्णालयाच्या वार्डमध्ये जागा नसल्यानेच दिसून येत आहे रुग्णांच्या नातेवाइकांना चक्क वरांड्यात झोपावे लागत आहे. प्रचंड उंकाडे दिसून येत आहे अस्वच्छ परिसर आणि निकामी सुविधा यामुळे रुग्णांची अवस्था आणखी बिकट झालेली आहे.
रुग्णालयातील वार्डची परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे की, ठिकठिकाणी घाण साचलेली दिसून येत आहे अशा दुर्गंधीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तिथे थांबणेही कठीण झाले आहे. स्वच्छतेच्या नावाने केवळ दिखावा दिसत असून संसर्गाचा धोका वाढत असतानाही दिसत आहे तरी प्रशासनाचे डोळे मात्र झाकलेले दिसत आहेत.
यावरून गंभीर बाब म्हणजे, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वार्डमध्ये सुद्धा पुरेसे पंखे पण सुध्दा नाही किंवा थंडाव्याची कोणतीही योग्य सुविधा पण निर्माण झालेली नाही आणि सुध्दा योग्य व्यवस्था पण निर्माण झालेली नाही. अनेक पंखे बंद, काही निकामी, आणि काही ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी खिडक्यांचीही योग्य व्यवस्था निर्माण नसल्याने दिसून येत आहे रुग्ण अक्षरशः घामाघूम होऊन उपचार घेत आहेत.
प्रश्न असा निर्माण होतो की, सरकारी निधी जातो तरी कुठे? आरोग्य सुविधांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च होत असल्याचे दाखवले जाते, तरी रुग्णांना बेड, सुद्धा स्वच्छता अभियान आणि थंड हवा यासारख्या मूलभूत सुविधा का मिळत नाहीत? प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा की जाणूनबुजून केलेला दुर्लक्ष?
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जात आहे आम्ही उपचारासाठी आलो की हालअपेष्टा सहन करण्यासाठी?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने सेलू ग्रामीण रुग्णालयाची चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हा निष्काळजीपणा मुळे एखाद्या मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकतो. अशी अपेक्षा गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळू नका असा प्रश्न नागरिकांना मध्ये उपस्थित झाला आहे हा खेळ थांबविण्यात यावा अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करीत आहे!



