ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजसेवेचे कार्य महान_पाणपोईतून भागवली तहान..!

ग्रामीण रुग्णालय आणि गांधी चौकात पाणपोई सुरू ; विविध सामाजिक उपक्रमांनी युवा नेते राकेश पून यांचा वाढदिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

भारतीय जनता युवा मोर्चा चे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, राजुरा मतदारसंघांचे आमदार देवराव भोंगळे यांचे कट्टर समर्थक,युवा नेते, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष, नगरसेवक राकेश पूण यांचा वाढदिवस आज (१७ मे) विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

राकेश पून हे गेल्या दिड दशकापासून सामाजिक कार्य व राजकारणात आहेत. विध्यार्थी दशेतच त्यांनी आपल्या कार्याला सुरवात केली. विध्यार्थी मंडळीचे विविध प्रश्न, जनसामान्यांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा यशस्वी एल्गार पुकारला. प्रस्थापित राजकारण्याना धक्का देत २०१५ मध्ये पहिल्यांदा नगरसेवकपदी निवडून आले. यानंतर ते पहिल्यांदा बांधकाम सभापती पदी विराजमान झाले. याकाळात त्यांनी पुढाकार घेत गोंडपिपरी च्या विकासासाठी तत्कालीन अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून वीस कोटी रुपयाचा निधी खेचून आणला.

राकेश पून यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी राममंदिर देवस्थानात गणेश कानापूरवार यांच्या आयोजनात महाआरती करण्यात आली. यानंतर ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व गांधी चौकात लक्ष्मीकांत जैन व मित्रपरिवाराच्या वतीने पाणपोई चे उदघाटन करण्यात आले. भाजप कार्यालय, अयोध्या नगरी, इंदिरा नगर, शिवाजी चौक, गांधी चौक, पंचशील वॉर्ड,महादेव वॉर्ड,आझाद हिंद चौक, भाजीपाला मार्केट याठिकाणी वाढदिवस सोहळा संपन्न करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वाती वडपल्लीवार, प्रकाश रापलवार, विवेक राणा,प्रीतम पोहणकर,श्रीराम सेना,तिरुपती झाडे, प्रज्वल बोबाटे, ओम व्याडकर, अक्षय नगारे,अंकित आखाडे यांनी विविध प्रभागातील कार्यक्रमाचे आयोजन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये