विश्व हिंदु परिषदेने राबविले ग्राम स्वच्छता अभियान

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
ओजस्वी हिंदु संघटना म्हणून परिचित असलेल्या विश्व हिंदू परिषदेची पाचगाव कार्यकारिणी तयार करण्यात आली असुन नवनिर्वाचित कार्यकारिणीने गुरुदेव सेवा मंडळाच्या सहकार्याने पाचगाव येथे ग्राम स्वच्छता अभियान राबविले. ह्या अभियानाअंतर्गत संपुर्ण गावातील रस्ते स्वच्छ करण्यात आले असुन गावाचा विकास, आरोग्य व सुंदर गाव ह्या संकल्पनेतून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व पटवुन देण्यात आले.
पाचगाव येथिल बस थांबा अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांमुळे झाकोळला असल्याने तेथील झाडांची व्यवस्थित कापणी करून बस थांब्याचा परिसर सुशोभित करण्याचा संकल्प देखिल ह्यावेळी घेण्यात आला. याचबरोबरच संपुर्ण गावात हिरवळ दिसावी त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षण होऊन गाव प्रदुषण मुक्त राहावे ह्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणार असल्याचे उपस्थितांनी ठरविले असुन लवकरच यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.
विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा धर्माचार्य संपर्कप्रमुख ह्यांच्या हस्ते ग्राम स्वच्छता अभियानाचे उद्घाटन करण्यात आले ह्या प्रसंगी बजरंग दल प्रखंड सहसंयोजक युतेश भेंडे, विश्व हिंदू परिषदेचे पाचगाव अध्यक्ष आकाश नुलावार, माजी उपसरपंच
गोपाल जंबुलवार , माजी तंटामुक्ती अध्यक्ष रुपेश गेडेकर, लक्ष्मण नुलावार, गजानन भेंडे, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष रामचंद्र मोरे , उपाध्यक्ष किसन पाल, सुधाकर गेडेकर, गणेश पिंपळकर, दशरथ भोयर, प्रकाश कोहपरे, दिलीप घ्यार, पश्यू वैद, मारोती घ्यार, गुरुदेव सेवा मंडळ सदस्य, मालन पाल, निशिकांत भेंडे, उदय नूलावार, विशाल भेंडे, हर्षद चहारे, मंथन सूत्रपवार, तुषार बहिरवार, पृथ्वीराज वरारकर, अतुल राजूरकर, समीर चापले, हर्षद चहारे, पियूष पाकलवार, आकाश लाड, कार्तिक मडावी, मयूर जीवतोडे, हर्षद महागावकर, संतोष मोरे आणि समस्त बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ता आणि पदाधिकारी उपस्थित होते.



