ताज्या घडामोडी

पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी घ्या – दत्ता बावणे ह्यांच्या कार्यकर्त्यांना सुचना

राष्ट्रीय मानव अधिकार पर्यावरण सुरक्षा एवं भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांची चंद्रपूरला भेट

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

एक पाऊल समाजासाठी..! ह्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रीय मानव अधिकार पर्यावरण सुरक्षा एवं भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबु सिंग झाला ह्यांनी चंद्रपूर येथे भेट देऊन संस्थेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ह्या भेटीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण बाबीवर चर्चा केली. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी जोमाने कामाला लागून आपले योगदान राष्ट्रहितास देऊन आपले संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने काम करण्याबाबत झाला ह्यांनी मार्गदर्शन केले.

चंद्रपूर जिल्ह्यात होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, वाढते प्रदूषण तसेच महा औष्णिक विद्युत केंद्र, कोळसा खाणी, धारीवाल कंपनी, मल्टि ऑरगॅनिक कंपनी, गडचिरोली येथील सुरजागढ प्रकल्पामुळे होणारे प्रदूषण तथा होणाऱ्या जड वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे होत असलेले वायू प्रदूषण तसेच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बहुमूल्य अशा जंगलाचे संवर्धन करण्याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.

मानव अधिकार पर्यावरण सुरक्षा एवं भ्रष्टाचार निवारण संघटनेचे ध्येय धोरण हे आपल्या मानवी जीवनाशी निगडित असून निसर्गाचा समतोल साधतांना आपल्याला जे काही चांगल्यात चांगले कार्य करता येत असेल ते आपल्या सर्वांना करण्याचा अधिकार व कर्तव्य आहे मात्र हे करत असताना संघटनेचे ध्येय अचूक मार्गाने जाण्यास कोणतीही बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे सुद्धा आपली स्वतःची मुख्य पदाधिकारी म्हणून जबाबदारी राहील असे प्रतिपादन संघठनेचे राष्ट्रीय सचिव दत्ता बावणे यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. ह्यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप कोणतमवार, संदीप दिकोंडवार, किशोर धोपटे, अरुण बुटले, अश्विन येलमुले, शाहिस्ता परवीन तसेच ईतर पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये