ताज्या घडामोडी

भारवी शास्त्रकारचा डबल धमाका – विज्ञान प्रदर्शनीत जिल्ह्यात तर अभिनयातील तालुक्यात प्रथम क्रमांक

आ. देवराव भोंगळे ह्यांनी केला भारवीचा सत्कार

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा तालुक्यातील हरदोना (खु.) ह्या लहान गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 7 व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थिनी भारवी शास्त्रकार हिने आपल्या बहुआयामी प्रतिभेची चुणूक दाखवत विज्ञान तसेच अभिनय क्षेत्रात अनुक्रमे जिल्हा व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविले असुन तिच्या विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगाला राज्य स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. तिच्या ह्या यशाबद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे ह्यांनी भारवीचा सत्कार केला असुन ग्रामीण भागातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांच्यातील क्षमतेचा विकास करण्यासाठी मदत करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

भारवी शास्त्रकर हिने चंद्रपूर येथिल भवानजी भाई हायस्कूल येथे झालेल्या 52 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मधे आदिवासी उच्च प्राथमिक गटातून सहभाग घेतला होता. शाळेच्या विज्ञान शिक्षिका तृप्ती वाघे (टिकले) ह्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनात भारवीने समाजाला उपयोगी विज्ञान व तंत्रज्ञान’ ह्या गटात टाकावू पासुन टिकावू ह्या संकल्पनेतून निरुपयोगी व जीर्ण कापडापासून कागद निर्मितीचा प्रकल्प ह्या संदर्भात प्रयोगाची प्रतिकृती सादर केली होती.

ह्या प्रदर्शनात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध प्रतिकृती व प्रयोग सादर केले मात्र त्या सर्व विद्यार्थ्यांना मागे टाकत भारवी हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला. हरदोना (खु.) है गाव राजुरा तालुक्याच्या सीमेवर असुन आदिवासी बहुल असल्यामुळे हे गाव शासनाने पेसा क्षेत्रात समाविष्ट केले आहे हे विशेष.

ह्यापूर्वी भारवी हिने तालुका स्तरावर आयोजित नवरत्न स्पर्धेत एकपात्री अभिनय स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला होता हे विशेष. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जाधव, शिक्षक मांडवगडे, शाळा व्यवस्थापन समिती, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, पालक, गावकरी यांचेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असुन आपल्या ह्या दुहेरी यशाचे श्रेय आपले पालक, शाळेचे मुख्याध्यापक, विषय शिक्षक तसेच विज्ञान शिक्षिका तृप्ती वाघे (टिकले) ह्यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाला असल्याचे भारवी हिने आपल्या मनोगतात सांगितले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये