ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरी येथे मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ संपन्न

आमदार देवराव भोंगळेची उपस्थिती ; शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यात यावर्षी मक्याचे भरघोस पीक झाले असून खाजगी बाजारपेठेत १६०० ते १७०० रुपये अल्प दर असल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल २४०० रुपये हमीभावाने शासकीय केंद्रावरच विकता यावा, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिपरी अतंर्गत शासकीय गोडाऊन पुरवठा विभाग गोंडपिपरी येथे मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते (१९ मे) करण्यात आला.

गोंडपिपरी तालुक्यातील मक्का उत्पादकांची वाढती संख्या लक्षात घेता, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी गोंडपिपरी येथे मक्का खरेदी केंद्र सुरू व्हावे व शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव मिळावा यासाठी पाठपुरावा करून मंजुरी मिळवून दिली. मात्र मका खरेदी करून ठेवण्यासाठी शासकीय गोडाऊन उपलब्ध नव्हते. ती अडचण लक्षात घेता, शासकीय गोडाऊन उपलब्ध करून दिले.

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये ६०० शेतकऱ्यांनी मका विक्री साठी ऑनलाईन केले असून तीस हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट आहे. मक्का खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आमदार देवराव भोंगळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले व अखेर गोंडपिपरी येथे मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.

यावेळी माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धूडसे, उपसभापती स्वप्नील अनमूलवार, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, संचालक सुहास माडुरवार, निलेश पुलगमकर, चंद्रजित गव्हारे, समीर निमगडे, महेंद्रसिंग चंदेल, गणपत चौधरी, विजय पेरकावार, संदीप पौरकर, बबन निकोडे,मारोती अमावार, प्रवीण धोडरे, आशिष मामीडपल्लीवार, शारदा गरपल्लीवार, संजना अम्मावार, सरिता मडावी यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये