ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सद्भावना दिनानिमित्त आरसीईआरटीमध्ये निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे व्याख्यान

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर द्वारा संचलित राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय (आरसीईआरटी), बाबूपेठ, चंद्रपूर येथे दि. २१ मे रोजी “सद्भावना दिवस” निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छोटुभाई पटेल सभागृह, आरसीईआरटी महाविद्यालय, बाबूपेठ, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

स्वर्गीय राजीव गांधी यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या आधुनिक, विकसित व तंत्रज्ञानाधिष्ठित भारताच्या स्वप्नाला अभिवादन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि सद्भावनेची भावना दृढ व्हावी, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

सदर कार्यक्रमास निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष मा. विनोद दत्तात्रेय अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी मा. वसुमना पंत (भा.प्र.से.) तसेच पोलीस अधीक्षक मा. आयुष नोपाणी (भा.पो.से.) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ट्रस्टचे विश्वस्त मा. शफिक अहमद, मा. सुरेश पोटदुखे, मा. अरविंद सावरकर पोरेड्डीवार, मा. निनाद गड्डमवार, मा. गिरीश ठक्कर, मा. प्रशांत पोटदुखे आणि मा. सुनील पटेल यांचीही उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये