धामणगाव अग्नी तांडवातील पीडितांना भद्रावती सामाजिक संस्थांतर्फे मदतीचा हात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे काही दिवसांपूर्वी मध्यरात्री भीषण आग लागून गावातील अनेक घरे व गोठे जळून खाक झाले. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून गुरे-ढोरे, शेळी-मेंढ्या गोठ्यात अडकून मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे संपूर्ण गावावर दुःखाचे सावट पसरले आहे.
या पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी भद्रावती शहरातील “हेल्पिंग हँड्स मल्टीपर्पज सोसायटी, भद्रावती NGO,” आणि “भीम आर्मी एकता मिशन, भद्रावती” यांच्या वतीने धान्य, शैक्षणिक साहित्य, भांडी, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यात आल्या. हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला आहे.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी भिम आर्मी तर्फे शंकर मून महाराष्ट्र महासचिव तथा जिल्हा प्रभारी, जितेंद्र डोहणे जिल्हाप्रमुख, अजय गजभिये जिल्हा उपाध्यक्ष, अतुल पाटील भद्रावती तालुकाप्रमुख, अजेंद्र ढोक, स्वाती मोरे, अश्विनी पाटील, अधिरा पाटील आणि हेल्पिंग हँड्स NGO सदस्य व इतर सामाजिक कार्यात सतत सहकार्य करणारे मिलिंद वाघमारे, कृतांत सहारे, प्रणय वाघमारे, कनिका सिकदर, महादेव दुपारे, मायाताई कोसे , देवानंद भाऊ पेटकर, एड. बोधिनी बोरकर, सोनल तेलंग, पंचफुला खोब्रागडे, रुपेश रामटेके, हेमंत वाघमारे, चंदन पेटकर, वंदना मून, रोशन रणवीर, किरण कवाडे, सुकेशनी रामटेके, राजेश, दीपक, भाग्यश्री थुलकर, राणी पाल, सुमेध कोठाडे, मीनल मून, तारकेश्वरी फणसे, अमोघ, सोनाली वाघमारे, प्रतीक मोबाईल शॉपी, शिल्पा, शुभम, अमिता, गुड्डू, भाऊराव, प्रशांत सातपुते, कैश शेख, सागर निरंजन, राजरत्न पेटकर, रिता सहारे, स्नेहा दारुंडे, तुषार दुर्गे, लीना उराडे, प्राची वेल्हेकर, अनिकेत बांबोडे, सुकेशनी मानकर, जया सपाटे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
समाजातील अशा एकत्रित प्रयत्नांमुळे पीडितांना दिलासा मिळाला असून मानवतेचे सुंदर उदाहरण समोर आले आहे.



