ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राणी राजकुंवर प्राथमिक शाळाbयेथे उत्साहात प्रवेशोत्स्व साजरा!

चांदा ब्लास्ट

शाळेचा पहिला दिवस! चैतन्यमय वातावरणात चिमुकल्या फुलपाखरांना बळ देऊन,द्यानाच्या वाटेवर जाऊन, नवी स्वप्न बघण्यासाठी शाळेत उत्साहात प्रवेशोत्स्व साजरा करण्यात आला. या मंगलमय सोहळ्याचे साक्षीदार म्हणून काही माजी विद्यार्थ्यानी उत्साहाने सहभाग घेऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.

माजी विद्यार्थी मा.सचिन माकोडे , सह आयुक्त,मनपा चंद्रपूर, मा.प्रज्वलंत कडू , नगरसेवक मनपा,स्नेहल फुलझेले,मनिषा नैताम,सुरज शर्मा, ॲड.योगेश्वर पचारे, सागर हांडे,संस्थेच्या उपाध्यक्ष माधवी भागवत , सदस्य वंदना सालफले , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष कल्पना क्षीरसागर, उपाध्यक्ष ममता बळी, व अन्य मान्यवर उपस्थित होते. या मंगलमय सोहळ्यात सर्व मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांना पुस्तके, दप्तर व खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले.त्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील सर्व माजी शिक्षिका व संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.संचलन रसिका पोटे, यांनी केले.तर आभार रागिणी नंदुरकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये