ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून पोलीस स्टेशन रामनगर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : मा. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या संकल्पनेतून व मा. सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामनगर यांच्या वतीने स्वाध्याय मंदिर, रामनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास मा. सुनील महाडिक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग वर्धा यांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले तसेच रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. यावेळी रक्तदान हे जीवनदान असून प्रत्येक नागरिकाने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून नियमित रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे, पोलीस स्टेशन रामनगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिरास पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लॉयर्स ब्लड बँक, वर्धा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये एकूण 71 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रक्तसंकलनाचे कार्य लॉयर्स ब्लड बँकच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस स्टेशन रामनगरचे अधिकारी व अंमलदार, लॉयर्स ब्लड बँकचे अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवक तसेच सर्व रक्तदाते यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी, सहकार्य करणाऱ्या संस्था व रक्तदात्यांचे पोलीस स्टेशन रामनगर यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून सर्वत्र स्वागत करण्यात येत असून, भविष्यातही अशा लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या वेळी पोलीस कर्मचारी होमगार्ड तथा इतर ग्रामस्थ तयार होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये