ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन देवळी यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत विविध कायदेशीर कारवाया…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक वर्धा श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव श्रीमती वंदना कारखेले यांच्या सूचनेनुसार पोलीस स्टेशन देवळी हद्दीत जून २०२६ महिन्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच अवैध धंदे, समाजकंटक व गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी खालीलप्रमाणे प्रभावी कारवाया केल्या-

१. जुगार प्रतिबंधक कारवाई:

जुगार अड्ड्यांवर छापे टाकून एकूण 01 गुन्हे दाखल करण्यात आले. 05 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व इतर मुद्देमाल असा एकूण रु. 1,00,060/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२. अवैध दारूविरोधी कारवाई:

दारूबंदी व अवैध मद्य विक्री/वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध 39 कारवाया करण्यात आल्या. 45 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवून विदेशी व देशी मद्य तसेच वाहनांसह एकूण रु. 7,75,047/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यामध्ये 6 वाहने जप्त करण्यात आली असुन 10 आरोपींतांना अटक करण्यात आली आहे.

३. गांजा/अंमली पदार्थविरोधी कारवाई:

अंमली पदार्थ विक्री, बाळगणे व पिणारे यांचे विरुध्द 02 गुन्हे दाखल करण्यात आले. 02 आरोपींना अटक करण्यात आली असून 138 ग्रॅम गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण रु. 1930/- किंमतीचा माल जप्त करण्यात आला.

४. हत्यार कायद्यानुसार कारवाई:

मौजा वायगाव (निपाणी) येथे बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तीविरुद्ध 02 गुन्हे नोंदविण्यात आले. 02 आरोपींकडून तलवारी, चाकू, जप्त करण्यात आले असुन दोन्ही आरोपीतांना अटक करून जेलमध्ये रवाना करण्यात आले.

५. प्रतिबंधक कारवाई:

सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सराईत गुन्हेगार, समाजकंटक व शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधक कायद्यानुसार कलम 93 म दा का 20, कलम 129 (ई) बि एन एस एस -02, 128 बि एन एस एस – 01, कलम 126,138(2) बि एन एस एस 20 अशा एकुण 42 कारवाया करण्यात आल्या. संबंधित व्यक्तींना नोटिसा देणे, ताब्यात घेणे व आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.तसेच दोन इसमानवर कलम 56 मु पो का अन्वये कार्यवाही करण्यात येत असुन त्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येत आहे.

६. हरवलेल्या (Missing) व्यक्तींचा शोध :

जून २०२६ महिन्यात पोलीस स्टेशन देवळी येथे दाखल असलेल्या हरवलेल्या मुला-मुली, महिला व पुरुष यांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडिया, विविध पोलीस स्टेशनांशी समन्वय तसेच नातेवाईक व नागरिकांच्या सहकार्याच्या माध्यमातून हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला.

या कालावधीत एकूण 09 हरवलेल्या व्यक्तींचा यशस्वीरित्या शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यामध्ये — मुले, 02 मुली, 05 महिला व 02 पुरुष यांचा समावेश आहे. तसेच आवश्यक त्या प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित न्यायालयाच्या आदेशानुसार अथवा नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली. पोलीस स्टेशन नांदगाव (खंडेश्वर) जि. अमरावती येथिल अप क्र 05/2026 कलम 137(2) बि एन एस मधिल मुलीचा शोध घेवुन पोलीस स्टेशन नांदगाव (खंडेश्वर) जि. अमरावती यांचे ताब्यात देण्यात आले.

हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेणे हे महाराष्ट्र पोलीसांचे अत्यंत संवेदनशील व प्राधान्याचे कार्य असून, भविष्यातही अशा प्रकरणांमध्ये तत्परतेने कार्यवाही करून हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा एकत्र आणण्यासाठी पोलीस स्टेशन देवळी कटिबद्ध आहे.

७. रस्ते सुरक्षा अभियानास यश सलग दोन महिने एकही प्राणांतिक अपघात नाही

पोलीस स्टेशन देवळी यांच्या हद्दीत रस्ते सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती, नियमित नाकाबंदी, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई, अतिवेग, ट्रिपल सीट, हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती, अवैध वाहतुकीवर नियंत्रण तसेच अपघातप्रवण ठिकाणी विशेष लक्ष ठेवून सातत्याने उपाययोजना करण्यात आल्या.

या प्रभावी उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम म्हणून माहे मे व जून २०२६ या सलग दोन महिन्यांच्या कालावधीत पोलीस स्टेशन देवळी हद्दीत एकही प्राणांतिक (Fatal) रस्ते अपघात घडलेला नाही. ही बाब पोलीस प्रशासन, नागरिक, वाहनचालक, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित असून, सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.

पोलीस स्टेशन देवळी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे, वाहन चालविताना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करण्याचे, मद्यपान करून वाहन न चालविण्याचे तसेच वेगमर्यादेचे पालन करण्याचे आवाहन करीत असून, भविष्यातही रस्ते अपघातमुक्त परिसर निर्माण करण्यासाठी अशाच प्रभावी उपाययोजना सातत्याने राबविण्यात येतील.

याशिवाय पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त, नाकाबंदी, संशयितांची तपासणी, हॉटेल, लॉज, ढाबे, बार, सार्वजनिक ठिकाणे तसेच गुन्हेगारांची पडताळणी यासंदर्भात नियमित विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत झाली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

सदरची कार्यवाही ठाणेदार श्री संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजभिये, क्ल्पेश मगरे, शिवराज जाधव व अमंलदार यांनी केलेली आहे.

पोलीस स्टेशन देवळी हे नागरिकांना आवाहन करीत आहे की, जुगार, अवैध दारू, अंमली पदार्थ, बेकायदेशीर शस्त्रे अथवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस स्टेशनशी किंवा डायल 112 वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये