डॉ. गायकवाड यांची सपत्नीक सेवानिवृत्ती निमित्य सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यात आरोग्य विभागात ग्रामीण रुग्णालंय गडचांदूर व कोरपणा गेल्या तेरा वर्ष वैद्यकीय अधीक्षक पदावर सेवा देणारे डॉ राजुनंद गायकवाड बालरोग तज्ञ वर्ग 1 हे आरोग्य विभागात 29 वर्ष 10 महिने 10 दिवस सेवा देऊन दिनांक 30 जुन ला जिल्हा सामान्य रुग्णालंय चंद्रपूर येथून बालरोग तज्ञ वर्ग 1 पदावरून सेवानिवृत्त झाले त्या निमित्य ग्रामीण रुग्णालंय गडचांदूर येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला
डॉ.गायकवाड याची
पहिली पोस्टिंग – ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही 1996 ते 2000 नंतर
ग्रामीण रुग्णालय चिमूर 2000ते 2001 ग्रामिण रुग्णालय सिंदेवाही
2001 ते 2004 उपजिल्हा रुग्णालय वरोरा 2004 ते 2009
ग्रामीण रुग्णालय राजुरा
2009 ते 2014 ग्रामिण रुग्णालय कोरपना 2014 ते 2023
नंतर बदली जिल्हा रुग्णालय चंद्रपूर
चंद्रपूर वरून प्रतिनियुक्ती
ग्रामिण रुग्णालय गडचांदूर
वैद्यकीय अधिक्षक पदाचा कार्यभार अडीज वर्ष
सोबत ग्रामिण रुग्णालय कोरपणा येथील वैद्यकीय अधीक्षक पदाचा कार्यभार दीड वर्ष
नंतर बढतीवर जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे बालरोगतज्ञ् या पदावर नियुक्ती जून 2026 रोजी सेवानिवृत्त डॉ गायकवाड साहेब यांनी आपल्या शांत मनमिळावू स्वभाव त्याची आरोग्य विभागात काम करण्याची शैली तसेच प्रशासन चालवण्याची पद्धत कर्मचाऱ्याची अडिअडचण समजून काम गेले विशेष कोरपणा व गडचांदूर ग्रामीण रुग्णालय याचा विकास यांच्या कार्यकाळ झाला.आपले मनोगत भाऊकपणे व्यक्त करताना मला आरोग्य विभागात सेवा देताना आज पर्यत सर्वांनी उत्तम सहकार्य केले याचे सदैव आभार मानले .
गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सेवानिवृनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात डॉ. गायकवाड यांचा पत्नीसह, भारतीय संविधान व पेन देऊन सत्कार करण्यात आला.तसेच भेट वस्तू देण्यात आली.
कार्यक्रमात वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण येरमे, वैद्यकीय अधीकारी डॉ. गेडाम, डॉ. सोहेल शेख, डॉ. जाधव, डॉ. जुबेर, डॉ. मनीषा कन्नाके, डॉ. शहारे मॅडम, डॉ. रोहन निरंजने, डॉ. घुले, इन्चार्ज सिस्टर शिवानी कुंडले, मेघा कोरडे, मेघा चौरे,पूजा कोळी , विशाल ब्रदर, दक्षिणा सिस्टर, सयाम सिस्टर, पूजा सोनहिवरे ,विशाल कडू,भूषण राऊत, रमेश राठोड, नागदेवते, शैलेश ठवरे,प्रिया मसुरे, सुरज चिमुरकर,भूषण राऊत, शंकर लोणारे, शंकर चेडगूळवार, गोलू, आशिष, रेखा मावशी, प्रतीक्षा कदम व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



