ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती सदस्यांना पिपर्डा येथे प्रशिक्षण संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

          आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व एफ पी एस फाउंडेशन कडून पिपर्डा येथे समिती सदस्या करिता एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते ग्रामसभेला व वन नियम 2006 2008 व सुधारित केंद्र शासनाच्या नियमानुसार 2012 मुळे

पिपरडा सामाजिक वन हक्क व्यवस्थापन समितीला 348 हेक्टर . 33 आर क्षेत्राला वन हक्क मान्यता प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने टाटा इन्स्टिट्यूट या गावी तीन वर्ष आराखडा तयार करणे गावातील वनक्षेत्राचा अभ्यास करून आराखडा मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविला होता समितीने याला मंजुरी दिली असून यावर्षी नरेगा जी रामजी योजनेतून बांबू लागवड अल्प पावसावर तयार होणारे फळबाग इत्यादीचा आराखडा तहसीलदार गटविकास अधिकारी यांना सादर केला आहे.

  सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना कामाचे नियोजनजल जंगल जमिनीचे रक्षण ग्राम सभेचे महत्व तसेच ग्रामसभा सदस्यांना सहभागी करून घेण्यासाठी गावकऱ्यांची व समितीची भूमिका याबाबत फौंडेशनचे श्री शुभम वनवे यांनीसामूहिक वन हक्काच्या संबंधातल्या येणाऱ्या अडचणी सदस्यांची भूमिका व करावयाचे कामाची जबाबदारी याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन करून सर्व सदस्यांना सामूहिक व हक्क कलम 3 ( । )अंतर्गत इतर अधिकाराची माहिती सदस्यांना दिली व यापुढे पिपर्डा येथील सदस्यांनी पुढाकार घेऊन जल जंगल जमीन व कायद्याने प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करण्याबद्दल मार्गदर्शन केले एफपीएस अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नाला घेऊन कार्य करीत आहे हा भाग आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील असल्याने ग्रामसभेला महत्त्व आलेले आहे ग्रामसभेमध्ये गावातील प्रत्येक नागरिकांनी भाग घेणे अत्यंत गरजेचे आहे.

आपल्याला गौण वन गौण उपज यामधून गावातील नागरिकांना आर्थिक बळ मिळून नरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे याबाबत हाताळायचे कागदपत्र समितीच्या पारदर्शक लोकाभिमुख कार्य करण्याच्या पद्धती यावरही प्रकाश टाकला आपल्याला यानिमित्ताने एक कामाची संधी प्राप्त झाली असून या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढे यावे या सभेला सामाजिक कार्यकर्ते आम्ही आबिद अली समिती अध्यक्षा अश्विना मडावी ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव प्रभाकर कु डमेथे त्याचबरोबर समितीचे विपुल पंधरे संजय सोयाम इसरू मळावी बादल तिरणकर युनूस शेख वसंत डाकरे विक्रम उदे दीपक चांदेकर यांचे सह सर्व सदस्य उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये