ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नियोजित वेळेत विवाह लावून जपला बोरडे-वाढई परिवारानी आदर्श

शिस्तबद्ध नियोजनामुळे विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना :_ सध्या विवाह सोहळ्यांमध्ये तासन्‌तास विलंब होणे, पाहुण्यांची गैरसोय आणि नियोजनाचा अभाव हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र कोरपना येथील बोरडे परिवार आणि राजुरा तालुक्यातील कळमना येथील वाढई परिवाराने वेळेचे काटेकोर पालन करत विवाह सोहळा अगदी नियोजित मुहूर्तावर पार पाडून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शिस्त, व्यवस्थापन आणि संस्कार यांचा सुंदर संगम असलेल्या या विवाह सोहळ्याची परिसरात विशेष चर्चा रंगली आहे.

कोरपना येथील कलावती बोरडे व स्वर्गीय प्राचार्य गजाननराव बोरडे यांचे चिरंजीव चि. प्रतीक बोरडे (नायब तहसीलदार) यांचा विवाह कळमना (ता. राजुरा) येथील साधनाताई व पद्माकर बापूजी वाढई यांची सुकन्या चि. सौ. कां. आचल वाढई यांच्यासोबत १० मे रोजी राजुरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या विवाह सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा माजी आमदार सुदर्शन निमकर व वर्षा निमकर यांनी विवाह अगदी मुहूर्तावर लावल्याबद्दल नवदाम्पत्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांनी बोरडे व वाढई परिवाराच्या वेळेच्या नियोजनाचे विशेष कौतुक करत नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.

यावेळी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार सुभाष धोटे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारोतराव ठावरी, माजी नगरसेवक सुभाष तुरानकर, अनील कवरासे, वासुदेव आवारी, बाजार समिती उपसभापती संजय पावडे, केशव ठाकरे, तहसीलदार रामगुंडे, जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सय्यद आबिद अली तसेच कळमना येथील सरपंच नंदकिशोर वाढई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विवाह सोहळ्यादरम्यान बोरडे व वाढई परिवाराच्या वतीने शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार सुदर्शन निमकर आणि माजी आमदार सुभाष धोटे यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे व चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार,वणी चे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा, पोलिस निरीक्षक गडचिरोली, राहुल मडावी वणीचे तहसीलदार निखिल धूळधर गटविकासअधिकारी किशोर गज्जलवार, तहसीलदार महेश रामगुंडे, रवींद्र कापशीकर यांच्यासह अनेक शासकिय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.

या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे अचूक आणि शिस्तबद्ध नियोजन. वराचे भाऊजी तथा सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी यांनी विवाह वेळेत पार पडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनामुळे सर्व धार्मिक विधी नियोजित वेळेनुसार पार पडले. उपस्थितांनीही या वेळपालनाचे आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचे मनापासून कौतुक केले.

हजारो आप्तस्वकीय, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा विवाह सोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता “वेळेचे व्यवस्थापन आणि संस्कारांचा आदर्श” म्हणून परिसरात चर्चेचा विषय ठरला. कार्यक्रमाचे प्रभावी व नेटके संचालन अविनाश पिंपळकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये