पोलिस स्टेशन वर्धा शहराच्या दारूबंदी पथकाने प्रोरेड
एकूण १ लाख ३१ हजार १०० रुपयांचा दारूचा मुद्देमाल जप्त
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलिस स्टेशन वर्धा शहराच्या दारूबंदी पथकाने इतवारा बाजार परिसरात प्रोरेड करून अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे यावेळी पोलिस स्टेशन वर्धा शहर यांनी मोहीम राबविण्यात आली असून आज दिनांक रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान वर्धा शहराच्या पोलिसांनी दोन पंचासह इतवारा बाजार परिसरात प्रोरेड करण्यात आला आहे यावेळी अवैधरित्या मोहा दारू निर्मितीवर मोठी कारवाई करत तब्बल १ लाख ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवार रोजी इतवारा बाजार परिसरातील पारधी बेडा येथे करण्यात आली.
पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/१३८२ सुहास चांदोरे, पोशी/४०५ मनोज काकपुरे, पोशी/२६९ नवनीत वानखेडे महिला पोहवा/१२८८ वैशाली करमनकर यांनी पथकासह पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला.मिळालेल्या माहितीनुसार, पारधी बेडा, इतवारा बाजार येथे राहणारी प्रेमिला चव्हाण हिच्या झोपडीत गावठी मोहा दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार दोन पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. यावेळी झोपडीची तपासणी केली असता ११ प्लास्टिक ड्रममध्ये अंदाजे ११०० लिटर कच्चा मोहाचा सडवा तसेच ३ प्लास्टिक डबक्यांमध्ये सुमारे ७५ लिटर गावठी मोहा दारू आढळून आली.कारवाईदरम्यान खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला ११०० लिटर कच्चा मोहा सडवा किंमत अंदाजे १,१०,०००रुपये ७५ लिटर गावठी मोहा दारू किंमत अंदाजे १५,०००रुपये ११ प्लास्टिक ड्रम किंमत ५,५००रुपये ३ प्लास्टिक डबक्या किंमत ६००रुपये असा एकूण १,३१,१०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा प्रमोद मकेश्वर उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष ताले पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन वर्धा शहर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार सुहास चांदोरे सचिन भालशंकर पोलिस हवालदार वैशाली करमरकर महिला पोलिस हवालदार नवनीत वानखेडे पोलिस शिपाई मनोज काकपुरे पोलिस शिपाई यांनी केली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस स्टेशन वर्धा शहर करीत आहेत.



