ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरमसूर येथे पुनर्वसन संदर्भात शेती मूल्यांकनास सुरवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू : गरमसूर ता. सेलू जिल्हा वर्धा येथील क्षेत्र विस्तारीत बोर वनजमीन अपहरण-२ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या आदेशानुसार विशेष समिती गठीत करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या अधिसूचनेनुसार आणि वन (संरक्षण) अधिनियम १९८० अंतर्गत ही कार्यवाही करण्यात येत आहे. या प्रकरणात गरमसूर येथील शेतातील पिके, वन झाडे, शेतातील गोठे, रस्ते तसेच विविध प्रकारच्या बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या चौकशीसाठी उपविभागीय अधिकारी, वर्धा यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. समितीत कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत तसेच वन विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

सदर समितीला घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून या प्रकरणाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये