त्या आश्रम शाळेतील शिक्षण संस्था चालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा

चांदा ब्लास्ट
अनेक खाजगी शिक्षण संस्था चालक सरकारकडून शैक्षणिक संस्था, आश्रम शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळाची परवानगी तर घेतात,परंतु ती परवानगी विद्यार्थी व शिक्षकांच्या व समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी नसून फक्त त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचारी पद्धतीने आपली संपत्ती वाढविण्यासाठी असते.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील आश्रम शाळेतील सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यू करिता जेवढे प्रशासन व्यवस्था जिम्मेदार आहे, तेवढीच शिक्षण संस्था चालक जिम्मेदार असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा .
सरकारने अन्य शिक्षण संस्था चालकांच्या शाळा व महाविद्यालयची इमानदार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करून विद्यार्थ्यां करिता सुरक्षा व्यवस्था योग्य आहे की नाही याची खात्री करावी.
तसेच जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळेतील परिस्थिती व परिसरातील परिस्थिती याकडे लक्ष देणे ही गरजेचे आहे.
विवेक आंबेकर चंद्रपूर, नागपूर विभागीय पदाधिकारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद.



