मातृदिनानिमित्त सनराईज ग्रुपतर्फे योगा, सत्कार व वॉकिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मातृदिना निमित्त सनराईस योगा ऍक्टिव्हिटी बेनेफिट वूमन्स ग्रुप गडचांदूर तर्फे विशेष योगा उपक्रम, सत्कार सोहळा तसेच वॉकिंग स्पर्धेचे आयोजन रविवारी 10 मे रोजी करण्यात आले. मातृत्वाची शक्ती, आरोग्य व महिलांचा आत्मविश्वास यांचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.यावेळी सौ. मनोरमा शेरकी यांना गोंडवाना विद्यापीठा कडून सोशल वर्क विषयात पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.तसेच वॉकिंग स्पर्धे मध्ये विविध वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.पन्नास वर्षांवरील वयोगटात सौ. शोभा मोहोरले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.पन्नास वर्षांखालील वयोगटात सौ. स्वाती झाडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.सर्व विजेत्या तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.सनराईज ग्रुपच्या संचालिका कुंतल चौहान यांच्या नियोजन व मार्गदर्शना खाली हा कार्यक्रम पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मातृदिनानिमित्त महिलांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. योगा, आरोग्य आणि मातृत्वाचा सन्मान या संकल्पने तून हा उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमा साठी योगा कमिटीच्या सदस्यां मध्ये उज्जला शेरकी, . कृष्णा ठाकरे, वैशाली पारधी, अंजू विश्वास, छाया टोंगे तसेच सनराईज ग्रुपच्या सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग लाभला.
सूत्र संचालन छाया टोंगे तर आभार प्रदर्शन कुंतल चव्हाण यांनी केले योगा व आरोग्याच्या माध्यमातून मातृत्वाचा सन्मान करणारा हा कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला



