ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भिसी महसूल मंडळात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

चंद्रपूर : जिल्हातील भिसी महसूल मंडळाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ नुकताच ए. एन. लॉन येथे मोठ्या उत्साहात पार पडले. महाराष्ट्र शासनाच्या “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत आयोजित या शिबिरात विविध विभागांनी नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या.

कार्यक्रम तहसीलदार राजमाने यांच्या उपस्थितीत तसेच अप्पर तहसीलदार नीलिमा रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कृषी, महसूल, आरोग्य, वन, सेतू सुविधा, भुअभिलेख, नगर पंचायत, पशुसंवर्धन, आधार केंद्र आदी विभागांनी नागरिकांना विविध योजनांची माहिती व सेवा दिल्या. अन्नपुरवठा विभागाने शिधापत्रिका, महसूल विभागाने डिजिटल सातबारा वाटप, तर आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी व टीबीमुक्त भारत अभियानाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी नगराध्यक्ष अतुल पारवे, मुख्याधिकारी वंजारी मॅडम, उपाधीक्षक नीलकंठ कावळे, वैद्यकीय अधिकारी गिरेपुंजे मॅडम, नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील, मंडळ अधिकारी प्रशांत सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान ग्राम महसूल अधिकारी प्रवीण ठोंबरे यांचा आदर्श तलाठी पुरस्कार व विदर्भ पटवारी संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच सीबीएसई दहावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

सूत्रसंचालन संगीता चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन मोबिन शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला शेकडो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये