दारूची अवैध्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वर्धा येथील अमलदारांची दारूबंदी कायदयान्वये धडक कार्यवाही
देशी दारूच्या ५० पेटया व कारसह एकूण ७,५०,०००/- रू. चा दारूसाठा जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
हकीकत याप्रमाणे आहे की, दिनांक 09.05.2025 रोजी बाहेर जिल्हयातुन चारचाकी वाहनाने अकैयरित्या देशी दारूचा माल भरून दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्हयात येत असल्याबाबत मुखबिरकडुन खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो.स्टे. सांवगी मेघे सालोड बायपास रोडवर सापळा रचुन नाकेबंदी करून खबरेप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार पुलगाव रोडनी सालोड टि पॉईटकडे येतांना दिसली, खबरेतील कार तीच असल्याचे ओळखुन नाकेबंदी करून कार थाबंविली असता कार चालक रंजित थुरवाल हा पोलीस असल्याचे पाहुन गाडी मधुन पळुन गेला मौक्यावर कारमध्ये असलेल्या इसम नामे अमोल भागवत, वय 33 वर्ष, रा. गणेशनगर बोरगाव मेघे वर्धा याचें ताब्यातील कारचे डिक्कीतील व मागचे सिटवरील 1) निळया कलरच्या मोठ्या 50 प्लॅस्टीक चुगंडयामध्ये प्रत्येकी चुगंडयामध्ये टॅगो पंच कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम.एल.च्या 100 शिश्या असा एकुण 5000 शिश्या प्रती निप 70 रू. प्रमाणे किमंत 3,50,000/-रू. 2) एक जुनी वापरती मारूती सुझुकी कंम्पनीची स्विफ्ट डिझायर कार क. MH-27-BE-0062 किमत 4,00,000/-रु असा एकुण जु.कि. 7,50,000-/ रू.चा मुददेमाल मिळुन आल्याने आरोपीने सदरचा माल हा अमोल पाटील रा. धुळे याने विकत दिल्याचे सांगीतल्याने आरोपी नामे 1) अमोल सुभाष भागवत, वय 33 वर्ष, रा. गणेशनगर शिव मंदीर मागे, बोरगाव मेघे, वर्धा, ता. जिल्हा वर्धा, 2) रंजीत थुरवाल, रा. बोरगाव मेघे वर्धा, (पसार), 3) अमोल पाटील रा. धुळे, (पसार) यांचेविरूध्द पो.स्टे. सांवगी मेघे येथे अप.क. 397/26 कलम 65 (अ) (ई) 77 (अ). 83 म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे सा, यांचे मार्गदर्शनात मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर सा. यांचे निर्देशानुसार पोउपनि परवेज खान, पोलीस अमलदार गजानन लामसे, संजय बोगा, पवन निलेकर, अरविंद घुगे, समिर शेख, प्रमोद वाघमारे, रवी मुन सर्व संलग्न उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उपविभाग वर्धा तसेच विशाल मडावी सायबर सेल यांनी केली.



