गुलाल उधळला, फटाके फुटले! पश्चिम बंगालमधील विजयाने कोरपना शहर ‘भाजपमय’.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना :_ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यशाचे पडसाद कोरपना शहरात उमटले आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात एकत्र येत जोरदार जल्लोष केला.
येथील आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र परिसरात हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी यावेळी गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करून आणि एकमेकांना मिठाई भरवून विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हातात पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हा विजय उत्सव भाजप तालुकाध्यक्ष संजय मुसळे यांच्या नेतृत्वात पार पडला. याप्रसंगी जिल्हा आदिवासी आघाडी अध्यक्ष अरुण मडावी, तालुका महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, ॲड. पवन मोहितकर आणि युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्यात धम्मकीर्ती कापसे, जगदीश पिंपळकर, दिनेश ढेंगडे, विजय पानघाटे, कार्तिक गोनलावार, मनोज तुमराम, पुंडलिक उलमाले, सत्यवान घोटेकर, अभय डोहे, गजानन येडे, शंकर चिंतलवार, संतोष बोरडे, सचिन कुळमेथे, किशोर देवतळे, राजू चौधरी यांच्यासह तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पश्चिम बंगालमधील हा विजय कार्यकर्त्यांसाठी आगामी काळातील संघर्षासाठी नवी ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


