ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे पश्चिम बंगालच्या अभूतपूर्व विजयाचा जल्लोष 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

– पश्चिम बंगाल, येथील निवडणुकांमध्ये भाजप ला मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर कोरपना शहरात भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात जल्लोष साजरा केला. या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तसेच पक्षाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन विजय आनंद व्यक्त केला.

या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री संजय मुसळे यांच्या नेतृत्वात विजय उत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा आदिवासी आघाडी अध्यक्ष अरुण मडावी, तालुका महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे,शहराध्यक्ष अमोल आसेकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, अँड पवन मोहितकर,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश खडसे,धम्मकीर्ती कापसे, जगदीश पिंपळकर,दिनेश ढेंगडे,विजय पानघाटे,कार्तिक बोनलावार, मनोज तुमराम, पुंडलिक उलमाले,सत्यवान घोटेकर,अभय डोहे,गजानन येडे,शंकर चिंतलवार,संतोष बोरडे,सचिन कुळमेथे,किशोर देवतळे, राजू चौधरी, यांच्यासह तालुक्यातील व शहरात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये