दीड वर्षांपूर्वीची दुचाकी चोरी उघड
अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : वर्धा शहर पोलिस स्टेशन गुन्हे शोध पथकाने (डी. बी पथक ) उत्कृष्ट तपास करत दीड वर्षांपूर्वी झालेल्या दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावला असून एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
फिर्यादी राजेश महादेव घोडे (वय 54 रा. भीम नगर, वर्धा) यांनी त्यांच्या मालकीची मोटारसायकल (क्र. MH 32 AT 4333) २२ नोव्हेंबर २०२४ रोजी हरविल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिस हवालदार प्रशांत वंजारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी चेतन उर्फ छोटू धोंडे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीची मोटारसायकल विकल्याचे सांगितले. पोलिसांनी सदर वाहन जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.
तसेच, मुख्य आरोपी सतीश मडावी हा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव रहिवासी असून त्याच्यावर यापूर्वीही चोरी व घरफोडीचे सुमारे 40हुन अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक, सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ठाणेदार संतोष ताले पो. नि. विनोद चौधरी यांच्या निर्देशनुसार करण्यात आली या पथकात पोलीस हवालदार प्रशांत वंजारी नरेंद्र कांबळे, अमोल आत्राम, वैभव जाधव, श्रावण पवार आणि इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रशांत बंजारी करीत आहेत.



