ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतशिवारात केबल चोरी : शेतकरी हवालदिल

भुरट्या चोरांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेत शिवार असुरक्षित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत गवराळा येथील शेतात असलेल्या बोअर व्हेल चे केबल चोरीस गेल्याची घटना आज दि.०३ रोजी सकाळी उजेडात आली.

कास्तकार सुरेश खापणे, रवी बोडेकर, माधव डाहुले , प्रभाकर सावनकर नामदेव उपरे यांचे शेत लागून आहेत.बोअर व्हेल द्वारे जलसिंचन करण्यात येऊन पिके घेतली जातात मात्र दि.०२ रोजीच्या रात्री अज्ञात आरोपींनी चक्क सर्व लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतातून तांबे असणारी केबल चोरून नेले. चोरट्यांनी केबल शेतातच जाळले तसेच माधव डाहुले यांच्या शेतात असणाऱ्या मकाना वर चक्क झोपा हि काढल्या.

सदर घटना लक्षात येता सबंधित शेतकऱ्यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सबंधित घटनेने शेत शिवारातील शेतकऱ्यांत शेती अवजारे ,खते, बी बियाणे, विद्युत मोटर आदी साहित्य चोरीस जात असल्याने असुरक्षितता निर्माण झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये