ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दलीतमित्र वी. तु. नागपुरे डी. एड. कॉलेजमध्ये निरोप समारंभ संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शैक्षणिक अध्ययनाचे कार्य पूर्ण करणाऱ्या, डी. एड. पदविकेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ स्थानिक दलितमित्र वी. तु. नागपुरे डी. एड. कॉलेजमध्ये संपन्न झाला. हा निरोप समारंभ प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून आयोजित करण्यात आला होता.

         निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सरोदे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. गजभिये, प्रा. खामणकर, प्रा. कारडवार यांची उपस्थिती होती. प्रथम आणि द्वितीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांनी भावनिक होऊन आपल्या दोन वर्षांतील आठवणींना उजाळा दिला. इतकेच नाही तर, भविष्यात अध्यापनाचे स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्द कायम राहणार, असे मतही व्यक्त केले.

        खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या निरोप समारंभ कार्यक्रमाचे संचालन सोमनाथ येलमुले यांनी तर आभारप्रदर्शन शिवानी मेश्राम या विद्यार्थ्यांनी केले. निरोप समारंभ कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गौरकर, राजवीर धुडसे, राकेश दुर्गे, आनंद झाडे यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये