ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पीएम श्री केंद्रीय विद्यालय भद्रावती येथे विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी पीएम श्री केंद्रीय विद्यालय, भद्रावती येथे विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या यांच्या हस्ते सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात मुंबई संभाग स्तरावर अंडर-१४ व अंडर-१७ गटात सुवर्णपदक मिळविणाऱ्या संघांचा विशेष गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट यश संपादन करून विद्यालयाचा गौरव वाढविला आहे.

तसेच “देखो अपना देश” या उपक्रमांतर्गत आपल्या राज्याची सांस्कृतिक माहिती सादर करून राज्यस्तरीय पुरस्कार मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

याशिवाय, दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित “जल पखवाडा” अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शिक्षकवृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये