ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंदिरा ग्रामीण विद्यालय पांढरकवडा येथील तीन विद्यार्थ्यांचे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत दैदिप्यमान यश!

धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडच्या सामाजिक दायित्व निधी अंतर्गत ३ वर्षांपासून सुरु असलेल्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची फलश्रुती

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_  शिक्षण हा एकमेव प्रगतिचा मार्ग असून शिक्षणाच्या उच्च संधी प्राप्त होणे हे सुद्धा गरजेचे असते. अनेकांच्या जीवनाच्या यशस्वीततेचा पाया शिक्षणापासून सुरु होतो व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते नक्कीच शक्य होत, हे महत्वपूर्ण उद्दिष्ट धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड व पहेल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या वतीने सामाजिक दायित्व निधी अंतर्गत हा उपक्रम निरंतर सुरु आहे. आज या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे पांढरकवडा येथील इंदिरा ग्रामीण विद्यालय येथील ३ विद्यार्थ्यांनी थेट जवाहर नवोदय विद्यालयात झेप आहे.

   धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड सामाजिक दायित्व निधी अंतर्गत शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण व सेंद्रिय शेती या महत्वपूर्ण बाबींवर विशेष प्रयत्न करीत आहे. या संकल्पनेतूनच पांढरकवडा येथील १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या विशेष वर्गातून प्रिती फुलझेले, ऋतुजा टेकाम आणि अरमान खामनकर या विद्यार्थ्यांनी थेट जवाहर नवोदय विद्यालयाचा पल्ला गाठला आहे. सदर विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे विद्यार्थ्यांच्या परिवारात, संस्था व गांवातील लोकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. या यशाबद्दल श्री. देवेश कुमार, स्टेशन हेड, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी अभिनंदन केले.

     या विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल शाळॆत त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात प्रभारी संवर्ग विकास अधिकारी पुंडलिक पाल, इंदिरा ग्रामीण विद्यालयाचे मुख्याध्यापक देठे सर, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड मानव संसाधन विभाग प्रमुख दिनेश गाखर, वरिष्ठ प्रबंधक डॉ अनिष नायर, उपव्यवस्थापक प्रतीक वानखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती अशी माहिती उपव्यवस्थापक रवि चावरे यांनी दिली.

      विद्यार्थ्यांच्या या यशात धारिवाल इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड व पहेल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूर यांच्या वतीने नियुक्त बालसखी कुमारी आकांक्षा देशमुख यांचे विशेष योगदान असून त्यांनी प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करून घेतली. या यशाबद्दल श्री. देवेश कुमार, स्टेशन हेड, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि पहेल मल्टीपर्पज सोसायटी, चंद्रपूरच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे, बालसाखीचे व तसेच इंदिरा ग्रामीण विद्यालयाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये