ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“जल ही जीवन, सेवा हाच धर्म” – अल्का आत्राम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्व. श्रीनिवास आत्राम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कु. अल्का आत्राम यांच्या वतीने पोंभुर्णा येथील आठवडी बाजार परिसरात नागरिकांसाठी पाणपोई सुरू करण्यात आली.

उन्हाळ्याच्या कडक तापमानात खेड्या-पाड्यातून मोठ्या संख्येने नागरिक आठवडी बाजारासाठी पोंभुर्णा येथे येत असतात. या प्रखर उन्हात थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती कमी व्हावी, या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.

याबाबत बोलताना अल्का आत्राम यांनी सांगितले की, “जल ही जीवन आहे आणि सेवा हाच धर्म आहे. उन्हाच्या तीव्रतेत प्रवास करून आलेल्या नागरिकांना जेव्हा थंड पाणी मिळते, तेव्हा त्यांना मिळणारा दिलासा हा आमच्यासाठी समाधानकारक असतो. हीच सेवा आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे.”

या पाणपोई उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, अनेकांनी या सेवाभावी कार्याबद्दल आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये