ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर पंचायत पोंभुर्णाचे प्रथम नगराध्यक्ष स्वर्गीय गजानन गोरंटीवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाणपोईचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा नगर पंचायतचे प्रथम नगराध्यक्ष स्वर्गीय गजानन गोरंटीवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज दि. 28 एप्रिल 2026 रोजी पोंभुर्णा शहरात नागरिकांसाठी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

ही पाणपोई स्व. गोरंटीवार यांचे सुपुत्र श्री दर्शन गजानन गोरंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली असून, तिचे उद्घाटन अन्वर खा पठाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमास हरिजी ढवस (तालुका अध्यक्ष, भाजपा), कु. अल्का ताई आत्राम (प्रदेश महामंत्री), राहुलभाऊ संतोषवार (माजी जि.प. सदस्य), ऋषी कोटरंगे (शहर अध्यक्ष), सुलभा गुरुदास पिपरे (नगराध्यक्ष, न.प. पोंभुर्णा), अजीत मंगळगिरीवार (उपाध्यक्ष, न.प. पोंभुर्णा), गुरुदास पिपरे, दिलीप मेकलवार (पत्रकार), नंदा कोटरंगे (सभापती, महिला व बाल कल्याण), श्वेता वनकर, आकाशी गेडाम (नगरसेविका), रजिया कुरेशी (माजी उपाध्यक्ष), सुनीता मेकलवार, नेहा बघेल (माजी नगरसेविका), तसेच राजू ठाकरे, अविनाश ढोंगे, महेंद्र वनकर, खुशाल कावळे, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून स्व. गोरंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विकासदृष्टी व जनसेवेच्या भावनेचे स्मरण केले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून नागरिकांनी दर्शन गोरंटीवार यांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाची सांगता स्व. गजानन गोरंटीवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये