जोडणघाट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
प्रेरणादायी मार्गदर्शन ; महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील जोडणघाट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात पार पडली. यावेळी ध्वजरोहण पूज्य भदंत वंगीस महाथेरो चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. आपल्या भाषणातून भदंत महाथेरो यांनी आंबेडकरांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित करत समाजाला एकतेचा व प्रगतीचा संदेश दिला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.सोमाजी गोंडाणे माजी जिल्हाध्यक्ष, वं.ब. आघाडी, चंद्रपूर, आयु. श्रावण जिवणे बौद्धाचार्य, जिल्हा संघटक तथा तालुका अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, कोरपणा यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकत एकजूट ही महत्वाची असल्याचे अधोरखीत करत विहार ही ज्ञानाची व चळवळीची केंद्रे बनली पाहिजे असे सांगितले. सोबतच प्रियाताई खाडे जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी, चंद्रपूर, मधुभाऊ चुनारकर सामाजिक कार्यकर्ते, गडचांदूर, ईश्वर सोयाम युवा वक्ते, गडचांदूर तसेच दिपक साबने तालुकाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, जिवती यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात दोन लहान मुलींनी इंग्रजी भाषेत प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन गजानंद मसुरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पंडित श्रीकांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष किसनराव कांबळे, उपाध्यक्ष संजीव सोनकांबळे, सचिव सिद्धार्थ सोनकांबळे तसेच नवयुवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समितीचे अध्यक्ष किसनराव कांबळे, उपाध्यक्ष संजीव सोनकांबळे, सचिव सिद्धार्थ सोनकांबळे तसेच नवयुवक मंडळींनी परिश्रम घेतले. या प्रसंगी परिसरातील गावकऱ्यांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला.



