ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

IPL live क्रिकेट मॅचवर सट्टा जुगार चालवीणाऱ्या बुकीवर जुगार कायद्यान्वाये रेड

एकुण 1 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  दि.25/04/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पथक वर्धा शहरात पेट्रोलिंग करत असता गुप्त माहिती मिळाली की,  अविनाश मतेलकर, राहणार पूलफ़ैल वर्धा हा आपल्या साथीदारसह आपले राहते घरी राज्यस्थान रॉयल विरूध्द हैदराबाद सन रायझर्स या लाईव्ह क्रिकेट मॅचवर सट्टा जुगार चालवित आहे. अश्या माहितीवरून आरोपी चे राहते घरी रेड केला असता आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता लोकांकडून पैसे घेऊन सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर हार जितचा क्रिकेट जुगार खेळ खेळतांना मिळून आले. सदर आरोपीचे ताब्यातून नगदी 5000/ रुपये, दोन मोबाईल किंमत 1,35,000/ रुपये व इतर साहित्य असा एकूण जुमला किंमत 1,40,000 /-चा मुद्देमाल जप्त करून आरोपी

1) अनिवाश संजय मतेलकर वय 37 वर्ष रा.सुदर्शन नगर वर्धा 2) संदीप जगजीत नैन वय 31 वर्ष रा सिंधी मेघे वर्धा यांचे विरुद्ध पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही *मा. पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलीस उप निरीक्षक विजयसिंग गोमलाडू पोलिस अंमलदार सचिन इंगोले अरविंद इंगोले, मिथुन जिचकार,दीपक साठे,प्रफुल पुणवटकर, महिला पोलीस अंमलदार पल्लवी बोबडे सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा* यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये