येल्लापूरमध्ये भीमजयंती उत्साहात
लेझीम सादरीकरण ठरले आकर्षण; विविध कार्यक्रमांनी गाव दुमदुमले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील येल्लापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भिमजयंतीनिमित्त १० एप्रिल रोजी ग्रामस्थांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले होते. गावातील सहा कार्यकर्त्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. त्यांच्या नियोजनानुसार मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले.
यावेळी जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा, येल्लापूर येथील विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर डॉ. आंबेडकर यांच्या गीतांवर आकर्षक सादरीकरण केले. या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली व ते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. भोजनदानानंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमही उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भास्कर वाघवसे, राजपाल बनसोडे, कल्याण सरोदे, दशरथ गायकवाड, कर्मराज कांबळे, चिराग भूतके, शुद्धोधन निखाडे, नितीन सोनकांबळे, हरिश्चंद्र सरोदे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.



