ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. आंबेडकर जयंती निमित्त गौतम नगर येथे ३० एप्रिल ला मोफत आरोग्य शिबीर

टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन व शिलभद्र मंडळाचा संयुक्त उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             गौतम नगर, भद्रावती येथील अशोका बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन, चंद्रपूर आणि शिलभद्र मंडळ, भद्रावती यांच्या संयुक्त प्रयत्नातून दि. ३० एप्रिल रोज गुरुवारला सकाळी ०९ ते दुपारी ०१ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

     सध्याच्या जीवन पद्धती तसेच खानपानामुळे अनेक नागरिक कॅन्सर सारख्या आजाराने त्रस्त आहेत. खास करून तोंडाचा कॅन्सर, महिलांमध्ये स्तन कॅन्सर आणि सर्वाइकल कॅन्सर अधिक प्रमाणात दिसून येत आहे. कॅन्सर झाल्यानंतर रुग्णांना लगेच लक्षात येत नाही त्यामुळे उपचार घ्यायला कधी कधी खूप उशीर होतो. त्यामुळे महिला आणि पुरुषांनी नियमित तपासणी करावी जेणेकरून अश्या दुर्धर आजारावर मात करता येऊ शकते.

     कॅन्सर चे वाढते प्रमाण लक्षात घेता शिलभद्र मंडळ आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत शिबिराचा लाभ शहरातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिलभद्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये