ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोंढा ग्रामस्थांकडून आमदार करण देवतळे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          मा. आमदार श्री. करणजी देवतळे वरोरा विधानसभा यांच्या माध्यमातून तसेच मा. शामसुंदर उरकुडे भाजप तालुका अध्यक्ष, भद्रावती ग्रामीण यांच्या पुढाकाराने कबड्डी खेळासाठी आवश्यक मॅट साहित्य सामाजिक दायित्व निधी डब्लू. सी.एल माजरी मार्फत कोंढा येथील क्रीडा मंडळ यांना उपलब्ध करून देण्यात आले.

ग्रामीण भागात क्रीडा सुविधा निर्माण व्हाव्यात आणि युवकांना खेळासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कबड्डी हा ग्रामीण भागातील अत्यंत लोकप्रिय खेळ असून, नव्याने उपलब्ध झालेल्या मॅटमुळे खेळाडूंना अधिक सुरक्षित आणि दर्जेदार वातावरणात सराव व स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमाबद्दल कोंढा ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अक्षय नागपुरे, शंकर मडावी, पांडुरंग निब्रड, आनंद राजुरकर, विनोद नागपुरे, विशाल गोंडे यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये