अवैध गांजा लागवड करणाऱ्या आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा शेतशिवारात अवैध गांजा लागवडीचा प्रकार बुधवारी उघडकीस आला असून पोलिसांनी धाड टाकून कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे.ही कारवाई दि.२३ रोजी गोंडपिंपरी पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ गोविंदा ठेंगणे (रा. पानोरा, ता. गोंडपिंपरी) याने आपल्या शेतामध्ये बेकायदेशीररित्या गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची देखभाल केल्याचे निष्पन्न झाले.छाप्यामध्ये शेतातून सुमारे ५३५ ग्रॅम वजनाचा,अंदाजे ५ हजार रुपये किमतीचा गांजा वनस्पती जप्त करण्यात आला.या प्रकरणी आरोपीविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत कलम ८(क) व २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे,हेड कॉन्स्टेबल कोवे, झाडे, गायकवाड, तिरुपती गोडसेलवार, तोडासे यांनी केली. यावेळी नायब तहसीलदार अरविंद चांदेकर देखील उपस्थित होते.



