ताज्या घडामोडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने सुटीचे खोटे पत्र व्हायरल – आज सुटी जाहिर झालेलीच नाही

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सुटी जाहिर केली नसल्याचा केला खुलासा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

जिल्हाधिकारी चंद्रपूर ह्यांच्या नावाने आज 28 जुलै रोजी सर्व शाळा महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याचे खोटे आदेश समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले असुन उपरोक्त पत्रात असलेला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश क्रमांक हा 27 जुलै रोजी देण्यात आलेल्या सुटीच्या आदेशाचाच असुन विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मागील आदेशात बदल करून आदेशातील तारखा बदलुन 27 जुलै ऐवजी 28 जुलै अशी तारीख टाकून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत आहे.

सदर पत्र व्हायरल होत असल्याचे लक्षात येताच चांदा ब्लास्टने सर्वप्रथम जिल्हा माहिती अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी असे कुठलेही आदेश मा. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अतिशय महत्त्वाचे : काही समाज माध्यमांवरून आज दिनांक 28 रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून आज 28 जुलै रोजी शाळा महाविद्यालयाच्या सुट्टीबाबत कोणताही आदेश काढण्यात आला नाही. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी.
– जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर 

कोणत्याही खोट्या पत्रावर अथवा मेसेजेस वर विश्वास ठेऊन अफवा पसरवू नये असे आवाहन चांदा ब्लास्ट तर्फे करण्यात येत आहे.

 

 

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये