ताज्या घडामोडी

संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थानाच्या अध्यक्षपदी हितेश चव्हाण तर उत्तम जाधव सचिव पदावर नियुक्त

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर, येथे 25 जुलै रोजी स्थानिक गोपाल मालपाणी सेलिब्रेशन हॉल येथे केंद्र प्रमुख अण्णाराव आडे यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा समाजाची सभा पार पडली. सदर कार्यक्रमात सर्वानुमते 17 सदस्यांची समिती मंजूर करण्यात आली. समाज संस्थानाला नाव देणेबाबत ‘क्रांतिकारी सेवालाल गोर बंजारा समाज संस्थान गडचांदूर, संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थान गडचांदूर, सद्गुरू सेवालाल महाराज बंजारा समाज सेवा संस्थान गडचांदूर असे 3 नाव सुचवण्यात आले.

संत सेवालाल महाराज गोर बंजारा संस्थान गडचांदूर शहराची 17 सदस्य कार्यकारीणी गठित करण्यात आली. नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेले हितेश आबाजी चव्हाण यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष रामचंद्र मोतीराम पवार, सचिव उत्तम जाधव, सहसचिव अशोक बळीराम जाधव, कोषाध्यक्ष कनिराम पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आर्थिक व्यवहाराचे अधिकार समितीचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, असे संयुक्त राहील, असा ठराव सुद्धा यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर कार्यकारिणीत माधव पवार, वामन बालाजी जाधव, कैलास पवार, गणेश करमटोट, संतोष तुळशीराम राठोड, देविदास नंदू पवार, सुभाष जाधव, दिलीप राठोड, विजय चव्हाण, शिवाजी राठोड, शंकर राठोड, रामसिंग पवार, ही मंडळी सदस्य म्हणून असणार आहे.

तसेच नामदेव जाधव, गोविंद पवार, विनायक राठोड, चंद्रपूर वनपरिक्षेत्र अधिकारी देवराव पवार, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पांडूरंग जाधव, सेवानिवृत्त मुखायाध्यापक पांडुरंग पवार, मुख्याध्यापक एम. डी. चव्हाण, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व्यवस्थापक मधुकर राठोड, अण्णा आडे, दामोदर राठोड, सुभाष जाधव, मुख्याध्यापक तथा संचालक रामबाबू पवार, सूर्यकांत राठोड, शिक्षक सोसायटी संचालक बंडू राठोड, चंद्रपूर जिल्हा परिषद अभियंता राठोड, उमेश आदे, हरी आदे, शंकर राठोड यांचा सल्लागार तथा मार्गदर्शक मंडळात समावेश करण्यात आला आहे.

विनोद चव्हाण ह्यांनी प्रास्ताविकात संस्थेबद्दल विस्तृत विवेचन केले तर बंडू राठोड ह्यांनी समाज कार्याला नेहमी सहकार्य राहील असे मत व्यक्त केले. अण्णाराव आडे यांनी समाजाचा विकास करण्यासाठी सामाजिक कार्यातून प्रगती करण्यात येईल, असे अध्यक्षीय भाषणातून म्हटले आहे. कार्यक्रमाचे संचालन गणेश राठोड यांनी तर विनोद चव्हाण ह्यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमात बंजारा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी नवनियुक्तांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये