मूल येथे घटनेतील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
भाजप महिला मोर्च्याचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
मूल : भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या वतीने आज येथील घडलेल्या गंभीर प्रकरणातील आरोपींना जलदगतीने कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच अशा प्रकारच्या घटनांतील दोषींना कोणतीही गय करू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.
या संदर्भात महिला मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी आमले साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. तसेच संबंधित प्रकरणात तातडीने आणि निष्पक्ष कारवाई व्हावी, यासाठी निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, शहर अध्यक्षा मनीषा गांडलेवार, किरण कापगते, आरती अक्केवार, लीना बद्देलवार, वाळके ताई, आशाताई गुप्ता, शेख ताई आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.



