ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दैव बलवत्तर म्हणून जीवघेण्या अपघातातून बचावले मुंद्रे कुटुंब

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           “काळ आला होता पण वेळ नाही ” या म्हणीचा प्रत्यय भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत नागपूर – चंद्रपूर या एन . एच.९३० महामार्गावरील टाकळी या गावाजवळ आला.

चंद्रपूर येथील दुर्योधन मुंद्रे वय.६२ व पत्नी ज्योत्स्ना दुर्योधन मुंद्रे वय.५९ रा. धांडे या हॉस्पिटल तुकूम, चंद्रपूर हे वाहन क्रमांक, एम एच.३४ बि.एफ.९१४१ चंद्रपूरला येत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टाकळी या गावाजवळ रस्त्याच्या कडेला वाहन पलटी होऊन क्षतिग्रस्त झाले.

सकृतदर्शनी क्षतिग्रस्त वाहन बघता सुदैवाने नशीब बलवत्तर असल्याने पत्नी, नामे ज्योत्स्ना किरकोळ जखमी झाल्या. तर वाहनचालक पती दुर्योधन मुंद्रे हे सुखरूप असल्याचे कळते. अपघातानंतर जखमींना भद्रावती येथील सामान्य रुग्णालयात नेले असता त्यांनी स्वतः निर्णय घेऊन नागपूर येथील किंग्स वे हॉस्पिटल ला ते परस्पर रवाना झाले.

११.५० वाजता अपघाताची सूचना मिळताच महामार्ग पोलीस केंद्र कोंढा फाटा सपोनी माया चाटसे व पथकातील एच.सी.५७३ पीसी २६७३ सह घटनास्थळी दाखल झाल्या.पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये