ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सलग चार दिवसापासून ८२ वर्षीय वृद्ध बेपत्ता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        सावरकर चौक वणी जिल्हा यवतमाळ येथील नामे पुंडलिक कृष्णाजी शेडामे वय. ८२ वर्षीय वृद्ध इसम दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास बाहेर दाढी कटिंग करून येतो असे सांगून गेले . वेळ होऊनही आणि सर्वत्र चौकशी करून वडील गवसले नाहीत. चिंताग्रस्त मुलगा नामे अमोल पुंडलिक शेडामे वय.४३ याने दि.१५ एप्रिल रोजी वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.

वृद्ध व्यक्ती पाच फूट उंच, अंगात पांढरा साधा शर्ट, व पायजमा परिधान केला असून पांढरी दाढी व पांढरे विरळ केस अश्या वर्णनाचे असून ज्या कोणास आढळून आल्यास 9604155811 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अथवा सावरकर चौक वणी, ता. वणी.जिल्हा. यवतमाळ येथे पोहचवून द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये