ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलगावच्या क्षितिज टेंभुर्णेचे क्षितिजा पलीकडील सीबीएससी परीक्षेत सुयश

९३ टक्के गुण मिळवून पटकावला नावलौकिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या क्षितिज मिथुन टेंभुर्णे याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. क्षितिजने ९३ टक्के गुण मिळवून आपल्या यशाची मोहोर उमटवली असून, त्याच्या या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. फुटबॉल चा खूप जास्त छंद असलेल्या…

क्षितिजने आपले शालेय शिक्षण ओडिसा राज्यातील झारसुगुडा येथील ‘डून पब्लिक स्कूल’मधून पूर्ण केले. अत्यंत चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर त्याने ९३ टक्के गुण मिळवून शाळेतून उत्तुंग यश प्राप्त केले. त्याच्या या यशाने सर्वत्र कौतुक होत आहे.

क्षितिजचे वडील मिथुन किसन टेंभुर्णे हे जेएसडब्ल्यू स्टील (JSW Steel) मध्ये यांत्रिक व्यवस्थापक (Mechanical Manager) या पदावर कार्यरत असून आई गृहिणी आहे. आपल्या यशाचे श्रेय क्षितिजने त्याच्या आई-वडिलांच्या मार्गदर्शनाला आणि शिक्षकांच्या पाठिंब्याला दिले आहे. ग्रामीण भागातील मूळ रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याने परराज्यात जाऊन मिळवलेल्या या यशाचे विशेष महत्त्व मानले जात आहे.

त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे आई– वडील, लहान बहिण, आजी-आजोबा,आत्या–मामा, काका आशिष टेंभुर्णे. त्याचे मामा अक्षय ढोले व निखिल नंदेश्वर सेलू. आणि नातेवाईक तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे पुलगाव आणि देवळी तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये