क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते स्वागत
नागरिकांना शीतपेये व फळांचे वाटप

चांदा ब्लास्ट
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांसह भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. महात्मा फुले सभागृहाजवळून निघालेल्या या शोभायात्रेचे जनसंपर्क कार्यालयासमोर आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री रविंद्र गुरुनुले, प्रदेश कार्यकारणी सदस्य तुषार सोम, बलराम डोडाणी, अजय जयस्वाल, अरुण तिखे, वंदना हातगावकर, नगरसेवक भालचंद्र दाणव, नगरसेविका शीतल गुरुनुले, अनुजा तायडे, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, प्रदीप किरमे, सुभाष अदमाने, प्रमोद शास्त्रकार, निलेश बेलखेडे, सायली येरणे, विमल कातकर, वंदना तिखे, विश्वजित शहा, सतीश तायडे, प्रलय मशाखात्री, सुप्रिया येरकल,रुपेश चहारे, विनोद पेंलीवार, रीना साखरकर, सोनाली ईटनकर, रेणुका येरणे आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने जनसंपर्क कार्यालयासमोर विशेष स्वागत मंच उभारण्यात आला होता. शोभायात्रेत सहभागी झालेल्या समाजबांधवांचे आमदार जोरगेवार यांनी मनःपूर्वक स्वागत केले. तसेच उपस्थितांना शीतपेये व फळांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा समाजावर झालेला प्रभाव अधोरेखित केला.
शोभायात्रेत मोठ्या संख्येने समाजबांधव, महिला, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही रॅली पार पडली.
महात्मा फुले यांनी दिलेले शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत. अशा महान विभूतींच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमुळे त्यांच्या विचारांचा प्रसार होऊन समाजात सकारात्मक परिवर्तन घडते, अशी भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.



