ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मा. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

भाजपा तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार यांच्या मार्गदर्शनात होणार मा ना मुनगंटीवार यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रम

चांदा ब्लास्ट/गणेश टोंगे/ विसापूर

महाराष्ट्र राज्याचे वने सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री चंद्रपूर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून येणाऱ्या 30 जुलै ला बल्लारपूर ग्रामीण चे तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, बामणी, पळसगाव, कोठारी या गावात मा ना सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन तथा विविध कार्यक्रम घ्यायचे असून भाजपा अध्यक्ष किशोर पंदीलवार यांनी रक्तदान श्रेष्ठदान या संकल्पनेतून जगात सर्वात मोठे कोणते दान असेल तर रक्तदान आहे आपल्या रक्तदाना मुळे आपन एखाद्या व्यक्तीचे जिवन वाचवू शकतो त्याच्या जीवनात नवीन आशेचा किरण निर्माण करू शकतो म्हनून प्रत्येक व्यक्तीने अवश्य रक्तदान करून आपला सहभाग नोंदवून आपले अमूल्य दान करून आपले जिवन सार्थकी लावावे आपण समाजाच्या कुठेतरी कामी पडू हा विचार अंगी बाळगून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे असे मत भाजपा अध्यक्ष किशोर पंदीलवार यांनी व्यक्त केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये